Friday, 26 June 2020
बहुगुणी उंबर (औदुंबर )
उंबर..( औदुंबर )
.... उंबर जिथे आहे तिथे श्री. दत्तगुरूंचा वास असतो.
असे हिंदू धर्मात मानले जाते. याच्या औषधी गुणांमुळेच
उंबराच्या वृक्षाला अध्यात्मिक महत्त्व आहे...
तेव्हा हा वृक्ष आपल्याला अमाप अशी निसर्गदत्त औषध
योजना बहाल करतो...... उंबराच्या सालीचा काढा
करून त्यात वेलची, खडीसाखर टाकून सरबत करावे.
कँसर सारख्या रूग्णाच्या अंगाचा जो दाह होतो त्यावर
आराम पडतो.दिवसातून तिनदा घ्यावे औंदुबरावलेह हे
प्रसिध्द औषध पित्तज विकारांवर प्रसिद्ध आहे.जखम
झाल्यास, याच काढ्याने धुतल्यास ती वेगाने बरी होते.
अतिसाराच्या वेळी रक्त पडल्यास हाच काढा
घ्यावा.गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठी रक्तप्रदर,
श्वेतप्रदर, मासिकधर्म जास्त जात असेल तर सालीचा
काढा पोटातून देतात.गर्भपात होउ नये म्हणून,गर्भाचे
नीट पोषण व्हावे म्हणून, याच्या सालीचा काढा
घेतात.उचकीवर उंबराच्या फळाचा रस घेतल्यास
थांबते.भस्मक नावाचा रोग आहे. त्यात सारखी भूक
लागते. पोट भरल्याची जाणिव होत नाही. तेव्हा
उंबराची साल दुधात घोटून द्यावी.काविळीत उंबराचे
पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात.ज्वरदाह, तीव्र
तापात, पिकलेले उंबर द्यावे.गोवर,कांजण्या, अतिसार,
उन्हाळी, मधुमेह या सर्व रोगांवर उंबराचे फळ,पाने,फूले
उपयोगात आणली जातात.किटकदंश, विंचूदंश
झाल्यास झाडाची पाने वाटून लावल्यास दाह, वेदना
कमी होतात.तोंडातले अल्सर , व्रण, छाले, यावर
उंबराच्या पानावर असे बुडबूडे( मोख) वर दिसतात. ते
काढून त्याची चटणी मधातून चाटण म्हणून द्यावे.
तोंडाचा दाह कमी होतो.अंगात उष्णता, कडकी
असल्यास उंबराची दोन फळे रोज खावीत
खडिसाखरेसोबत.. निघून जाते.तृष्णेचा आजार बरा
होतो.जेव्हा खूप तहान- तहान होते,जीव कासावीस
होतो.तेव्हा उंबराची साल वा कच्ची फळे पाण्यात
कुस्करुन सरबत करून द्यावे.डांग्या खोकल्यावर
उंबराचा चिक टाळूवर लावावा.ताबडतोब थांबतो.
किडनि स्टोन ( मूत्रखडा)याकरता उपाय उंबराच्या
झाडाच्या खोडाला खाच द्यावी व तिथेच एक भांडे
अडकावे रात्रभर.रस झिरपून भांड्यात गोळा होईल.तो
सकाळी पिण्यास द्यावा.किडनी स्टोन तुटून बाहेर
पडतो.उंबर फळ दुधात शिजवून खाल्यास पचनसंस्था
मजबूत होते.पोटाचे सर्व विकार बंद होतात.विशेषतः हे
थंड गुणधर्माचे असल्यानेच आम्लपित्त,मळमळ,पोटात
दाह, अल्सर सारखे आजार याच्या सेवनाने बरे
होतात.तेव्हा आपल्या परिसरात याचे झाड असणे
आवश्यक आहे.अतिशय उपयोगि औषधी गुणधर्माचा हा
वृक्ष कायम चिरतरूण ठेवतो.
उस्मानाबाद दोन पाॅजिटीव
दि. 26 #उस्मानाबाद येथून 81 swab तपासणी साठी वि दे शा वै महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून 2 पॉसिटीव्ह, 2 inconclusive व 77 नेगेटिव्ह असा आहे.
x
पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती
दोन्ही पेशंट नाळीवाडगाव ता.भूम येथील असून ते पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहेत.
आजच्या रिपोर्ट मध्ये बाहेरगावी असलेले दोन पेशंट समाविष्ट करण्यात आले आहेत.
Total cases 198.
Discharge 152.
Death 09.
Active patients 37
Thursday, 25 June 2020
तळपायांची,हाताची सतत आग होणे-कारणे व उपाय
१)नर्व्हस सिस्टममध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास
२)मधुमेहाची शक्यता असल्यास.
३)व्हिटमीनबी १२ ची कमी.
४)उच्चरक्तदाबामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे त्वचेच्या रंगात फरक दिसू लागणे, हात पाय थंड पडणे, या बरोबरच तळपायांची आग होऊ शकते.
५)लिव्हरशी निगडीत समस्या असल्यास.
६)थायरॉईड ग्रंथीचे कार्य सामान्य नसल्यास
७)रक्त वाहिन्यांमध्ये संक्रमण झाल्यास.
८) तसेच ज्या व्यक्ती एचआयव्ही किंवा कर्करोगासाठी औषधोपचार घेत असतील त्यांच्या बाबतीतही सातत्याने तळपायांची आग होण्याची समस्या आढळून येत असते.
९)फोलिक अॅसिड किंवा कॅल्शिअमची कमतरता असेल तर ही समस्या होऊ शकते.
१०)बध्दकोष्ठाचा त्रास पोटसाफ नसेल तरीही.
११)मद्यपानाचे व्यसन
१२)किडनी संबंधित आजार.
१३)एखाद्या किटकाचा दंश.
*उपाययोजना.
१)गाईच्या दुधापासून बनविल्या गेलेल्या तुपाने तळपायांची मालिश केल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन तळपायांची आग कमी होते
२)कैलास जीवन लावून माँलीश केल्यास.
३)एका मोठ्या टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा कप सैंधव घालावे. या पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटे पाय बुडवून ठेवल्याने तळपायांची आग कमी होते, तसेच पायांवर सूज असल्यास ती ही कमी होते.हा उपाय उच्चरक्तदाब, मधुमेह किंवा हृदयाशी निगडीत काही समस्या असणाऱ्या व्यक्तींनी करू नये.
४)दोन चमचे मोहरीचे तेल व दोन चमचे पाणी एकत्रित करून ते बर्फाच्या तुकड्याने पायाला लावणे.
५)दोन चमचे अँपलव्हेनिगर गरमपाण्यात घेतल्यास तात्काळ रिझल्ट येतो.
६)पायाला कोकम तेल लावायच ! हे तेल कोकणात मिळेल, हे तेल मळकट पांढर्या रंगाच असुन , सर्व साधारण
खुप घट्ट असत हे तेल, ह्या तेल खडु पेक्षा जरा जाडसर आकारात उपलब्ध असत .
७)कोहळा, पाव किलो साल काढुन,पांढरा दुधी पाव किलो साल काढुन,आवळा गर पाव किलो
आलं १२५ ग्रॅम साल काढुन एकत्रित करून ज्युस करून रोज घेत जा.
८)शतधौत घ्रुत पायाला लावत जा.
९)धनेजीरे पाणी पीत जा.
उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी चार रूग्ण पाॅजिटीव सापडले
तुळजापूर तालुक्यात चार कोरोना रुग्ण वाढले
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील चार जणांचा कोरोना रिपोर्ट आज पॉजिटीव्ह आला आहे.सर्वच्या सर्व पॉजिटीव्ह रुग्ण तुळजापूर तालुक्यातील आहेत.
आज २५ जून रोजी सामान्य रुग्णालय, उस्मानाबाद येथून ४६ स्वाब तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले आहेत, त्यापैकी चार पॉजिटीव्ह व ३९ नेगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत. पॉजिटीव्ह रुग्ण तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटी येथील दोन, हंगरगा येथील एक आणि वानेगाव येथील एक आहे. दरम्यान काल औंढा ता निलंगा. जि. लातूर येथील एक रुग्ण उमरगा येथे पॉजिटीव्ह आला होता तो आज लातूर जिल्ह्यात वर्ग झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण
कोरोना बाधित रुग्ण -१९४
बरे झालेले रुग्ण - १४४
मृत्यू - ९
ऍक्टिव्ह रुग्ण - ४१
Wednesday, 24 June 2020
उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच जणांचा कोरोना रिपोर्ट आज पॉजिटीव्ह आला आहे. पैकी तीन रुग्ण भूम तालुक्यातील , एक रुग्ण उस्मानाबाद तालुक्यातील तर एक रुग्ण उमरगा तालुक्यातील आहे.
आज २४ जून रोजी सामान्य रुग्णालय, उस्मानाबाद येथून ४६ स्वाब तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले आहेत, त्यापैकी पाच पॉजिटीव्ह व ३९ नेगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत. पॉजिटीव्ह तीन रुग्ण भूम तालुक्यातील नाळी वडगाव एक , ईडा एक आणि भूम शहरातील लक्ष्मीनगर एक तसेच उस्मानाबाद तालुक्यातील देवळाली एक आणि औंढा ता. निलंगा, लातूर येथील असून तो उमरगा येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. सर्व रुग्ण पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्ण -191
बरे झालेले रुग्ण - 140
मृत्यू - 08
ऍक्टिव्ह रुग्ण - 43
मी,माझी शाळा आणि माझे शिक्षक
कोरोना संकट मुळे सगळे लोक आपल्या घरी आहेत. प्रत्येकाला पुरेसा वेळ मिळत आहे..
आज असंच माझीशाळा एपिसोड युट्युब वर बघत असताना मला जाणवले, की आपली प्राथमिक शाळा त्यातील शिक्षक आणि या शाळेने मला काय दिलं. मी कसा घडलो त्यामध्ये शिक्षकांचा रोल किती महत्त्वाचा होता ह्याची जाणीव झाली..
आमच्यावेळी हाफ चड्डी पांढरा शर्ट आणि नायलॉन ची बॅग त्याच्यामध्ये वाहया पुस्तक..
ना त्यावेळी कसली ट्युशन असायची न पर्सनल गाईडन्स. जे काही घडलं ते शिक्षकांमुळे मला पहिली व दुसरीचे एवढे आठवत नाही पण तिसरी मध्ये असताना आम्हाला शिकवायला पाटील सर असायचे ते गावात राहायचे. ते खूप छान शिकवायचे , त्यांच्याविषयी एवढे आठवत नाही पण ते खूप छान शिकवायचे..यामध्येच आम्हाला भागवत तांबारे सर म्हणून शिकवायला आले. ते नेहमीच विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन लावायचे जो कोणी एक ते शंभर पर्यंत लिहून लवकर दाखवेल त्याला चॉकलेट, गणित लवकर सोडवेल त्याला चॉकलेट.. ते वर्गामध्ये चॉकलेटचा पुडा घेऊन यायचे. ते एक ते तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना सर्वांसमोर ऊभे करून चॉकलेट द्यायचे त्यामुळे असं वाटायचं की आपण खूप काहीतरी जिंकले, आपण खूपच हुशार आहोत... आणि प्रत्येक वेळी नवीन नवीन मुलं पुढे जायची त्याच्यामुळे सर्वांमध्ये कॉम्पिटिशन लागल्यासारखा वाटायचं आणि खूप मज्जा यायची अभ्यास करायला..
त्यानंतर चौथीमध्ये वायकर सर आमचे क्लास टीचर होते. वायकर सर जरा कडक होते चुकलं की फटके द्यायचे पण स्वभाव पण चांगला होता समजून पण खूप सांगायचे. त्यामुळे आमच्या वर्गाला एक वेगळेच वळण लागले होतो . शिस्तीच्या बाबतीत ते कडकच होते. चौथीमध्ये असताना मी जास्त हुशार बी नाही आणि ढ बी नाही असा मिडीयम विद्यार्थी होतो..
जेव्हा पाचवीमध्ये आलो तेव्हा नवीन एक सब्जेक्ट आला तो म्हणजे इंग्लिश त्याची भयंकर भीती आणि इंग्लिश विषय शिकवायला जगदाळे सर त्यांची तर जास्तच भीती , दहशत होती मनावर ते खूप मारायचे शब्द पाट नाही झाले की असे सहावीचे मुलं सांगायचे आम्हाला..
जगदाळे सरांनी आम्हाला पाचवी ते सातवी इंग्लिश शिकवलं खूप मारायचे पण जे काही इंग्लिश मला जमायचं किंवा जमतंय ते त्यांच्यामुळेच. ते आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने इंग्लिश शिकवायचे क्लासमध्ये रेडिओ घेऊन यायचे टेप घेऊन यायचे इंग्लिश कविता ते टेपवर लावून आमच्याकडून पाठ करून घ्यायचे.. त्यांच्याकडून इंग्लिश कविता शिकायला मजा यायची खेळीमेळीचे वातावरण असायचं.. ते आम्हाला दररोज शब्द पाठ करायला द्यायचे मला आठवतंय मी सकाळी लवकर उठून चिमणीच्या प्रकाशात सकाळ-सकाळ मोठ्यामोठ्याने शब्द पाठ करायचो.. कारण शब्द नाही आले कि मार हा असायचाच.. त्यांना शब्द पाठ न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा खुपच राग यायचा कारण ते तेवढेच जीव तोडून शिकवायचे आम्हाला.. मी आठवड्यातून एक दोन वेळा नक्कीच मार खायचो..
कन्हेरवाडी चे कवडे सर असायचे त्यांची मुलं खूप चेष्टा करायची.. ते आई वडिलांचे महत्व समजावून सांगायचे. आईला आपण आव जाव का बोलत नाहीत असं विचारायची.
त्यानंतर गावातील तांबारे मॅडम त्या गणित शिकवायचे त्या पण खूप छान शिकवायच्या..
वाघमारे सर खरंच खूप भारी व्यक्तिमत्व हे आमचे खेळांचे शिक्षक. त्यांच्यामुळेच आम्हाला कबड्डी, खो-खो खेळणे , 26जानेवारी असो किंवा 15 ऑगस्ट त्यावेळेस लेझीम, घुंगरू काठी , डान्स, कोळी गीत, याचा जीव ओतून सराव करून घ्यायचे त्यात खूप मज्जा पण यायची..
शिकवण्याच्या बाबतीत पण खूप छान होते. सर या सर्वांचा प्रॅक्टिस शाळा संपल्यावर पण करून घ्यायचे..वर्ग प्रमाणे झाडे लावणे झाडासाठी काटड्या तोडून आणणे प्रत्येक वर्गाने प्रत्येक विद्यार्थ्याच्या ग्रुपने ते झाडे सांभाळणे त्याच्यावर लक्ष असायचे..
पाचवी ला नवोदय व सातवीला कॉलरशिप ची एक्झाम असायची. यासाठी वेगळे क्लास असायचे मला आठवतय आम्हाला श्रीकांत तांबरे सर बुद्धिमत्ता चाचणी व गणित शिकवायचे. त्यांची शिकवण्याची पद्धत व विद्यार्थ्यांशी समजावून सांगण्याची पद्धत खरोखरच खूप वेगळी आहे. त्याच्यामुळेच कि काय मला बुद्धिमत्ता चाचणी व गणित खूपच आवडू लागले होते.. ते प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बाबतीत जागृत होते विशेष म्हणजे शाळा सुटल्यानंतर सुद्धा ते क्लास घ्यायचे व त्या क्लासला आम्ही आवर्जून बसायचो..त्यांचा
क्लास कधी बोर व्हायचाच नाही.
कॉलरशिप ला का नवोदय ला व्यवस्थित आठवत नाही पण कावळे सर पण गणित शिकवायचे. शाळा सुटल्यावर पण ते आम्हा काही विद्यार्थ्यांना घरी पण शिकवायचे. ते चांगले शिकवायचे, पण मला कधी त्यांच्याकडून गणित समजलंच नाही. माहित नाही पण त्यांच्या विषयी असलेली भीती होती का
काय? एकदा लेझीम खेळण्यासाठी धोतर घालत होतो, त्यामुळे मी उड्या मारत होतो की काय माहित नाही पण कावळे सरांनी त्या वेळेस खूप मारलं होतं. एवढे का मारले कळलच नाही?? त्यांनी माझ्यावर कुठला राग काढला हे ही कळलं नाही? त्यामुळे त्यांच्याविषयी अधिक भीती बसली ती कायमचीच.
मला आठवतय श्रीकांत तांबारे सर आम्हाला सातवी ला विज्ञान शिकवायचे. त्यांची शिकवण्याची पद्धत खरंच खूप वेगळी होती एका टेस्टमध्ये वर्गांमध्ये मी कधी नाही तो विज्ञान मध्ये प्रथम आलो होतो.. मी तसा अवरेज विद्यार्थी, मला मार्क्स कमी ही नाही आणि जास्तही नाही मध्येच असायचे.
पण विज्ञान मध्ये मी प्रथमच यायचो. हे असे कसे काय घडले कारण श्रीकांत सरांचे सर्व विद्यार्थ्यांना विषय असलेली अस्ता व शिकवण्याची पद्धत. ते कधीच कोणत्या विद्यार्थ्याला कमी लेखायचे नाहीत.. मला आठवतंय ते सहसा पुस्तक नसतानाच शिकवायचे व पुस्तका व्यतिरिक्त बरच काही सांगायचे.. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये त्या विषयाची असलेली आवड निर्माण होत असे. पुस्तका व्यतिरिक्त म्हणजे काय माणसाच्या शरीरात रक्त किती लिटर असतं. एका मिनिटात हार्टबीट किती असतात. माणसाच्या शरीरात हाडे किती असतात .कुठल्या शरीरावर केस नसतात. असे अनेक प्रश्न विचारून ते आम्हाला कुतूहल निर्माण करायचे. मला आठवतंय त्यांनी आम्हाला कधी कडक शिक्षा केली असं कधीच घडलं नाही.. ते आम्हाला चुका समजावून सांगायचे.. त्यामुळेच कि काय ते आमच्या वर्गाचे आवडते शिक्षक होते.जेव्हा मी विज्ञान मध्ये प्रथम यायचं तेव्हा मला कळले मी पण हुशार विद्यार्थी आहे..
हे केव्हा घडतं एखादा अवरेज विद्यार्थी चांगले मार्च केव्हा घेतो.
जेव्हा त्याला त्या विषयांमध्ये अभ्यास करण्याची आवड निर्माण होते व हे केव्हा होते एखादा शिक्षक त्याविषयी कुतूहल निर्माण करून शिकवतात..
खरंच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षकाचे महत्त्व खूप आहे आपण जे आहोत ते शिक्षकां मुळेच..
बुद्धी की सर्वांना सारखे असते पण त्या बुद्धीचा कशा पद्धतीने वापर करावा हे शिक्षकच शिकू शकतात. आणि ही कला काहीच शिक्षकाकडे असते..
पण मला माझ्या शाळेमध्ये मिळालेली सर्वाच शिक्षक ही आदर्श शिक्षक होती व आहेत..
अशा माझ्या सर्व गुरुजन वर्ग यांना मानाचा मुजरा ज्यामुळे मी आज घडलो आहे..👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ते म्हणतात ना गुरु म्हणजे
*गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः*
मुकुंद काळे..
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंदोरा, तालुका -कळंब जिल्हा -उस्मानाबाद*
Tuesday, 23 June 2020
आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
पुलवामात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या सोलापूरच्या सुनील काळे यांचं पार्थिव मूळगावी दाखल, आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, गावावर शोककळा
https://t.co/lLBUpXgKaX
पानगांव (ता. बार्शी) येथील CRPF जवान सुनिल काळे शहीद
सोलापूर/ पानगाव : पुलवामाच्या बंडजू भागात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मात्र, त्यात भारतीय एक जवान
शहीद झाला आहे.
आज पहाटे साडेचार वाजता पुलवामामध्ये अतिरेक्यांच्या चकमकीत पानगांव (ता. बार्शी) येथील CRPF जवान सुनिल काळे शहीद झाले आहेत.
पुलवामा येथील या चकमकीत सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना ठार मारले. सुरक्षा दलाने हा परिसर घेरला असून शोधमोहीम सुरूच आहे. जम्मू-काश्मीरमधील
पुलवामा येथे सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक झाली. पुलवामाच्या बंडजू भागात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा
केला आहे.
काश्मीर झोनचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, चकमकीत आतापर्यंत दोन अतिरेकी ठार झाले आहेत. आधीच्या वृत्तानुसार पोलिस, सैन्य आणि
सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने बंडजू येथे शोध मोहीम सुरू केली. सुरक्षा दलांनी संशयास्पद जागेभोवती जेरबंद केल्यामुळे दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार
केला.
कोरोनावर औषध सापडले-पतंजलि
ज्या गोष्टीची सर्वाना अतिशय प्रतिक्षा होती, ती गोष्ट आता प्रत्यक्षात उतरली आहे. कोणत्याही कोरोनाबाधित व्यक्तीला अगदी सहजपणे बरं होणं आणि जे लोक आतापर्यंत सुरक्षित आहेत त्यांनाही नेहमीच सुरक्षित राहणं सहज शक्य झालं आहे.
ही किमयागार औषधी शोधून काढली पतंजली च्या आयुर्वेद संशोधन विभागाने..
रामदेव बाबा यांच्या म्हणण्यानुसार या औषधीने एखादा अपवाद वगळता 99.99% रुग्ण बरे होणे सहज शक्य आहे. ही माहिती त्यांनी ABP माझा च्या "माझा कट्टा" या कार्यक्रमात दिली. या कार्यक्रमाची YouTube लिंक सुद्धा मी आपल्याला उपलब्ध करून देत आहे:
https://youtu.be/pcLld5BgRpU
*औषधी घटक आणि घेण्याची पध्दती खालीलप्रमाणे ( कोरोनाबाधित व्यक्तींसाठी )*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
*1. श्वासारी -* उपाशीपोटी
*2. अश्वगंधा टॅबलेट -* दिवसातून 3 वेळा जेवणानंतर
*3. तुलसी घनवटी टॅबलेट -* दिवसातून 3 वेळा जेवणानंतर
*4. गिलोय ( गुळवेल ) घनवटी टॅबलेट -* दिवसातून 3 वेळा जेवणानंतर
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
*वरील औषधींच्या एकत्रित सेवनाने कोणत्याही वयोगटातील कोरोनाबाधित व्यक्ती खात्रीशिरपणे बरी होणे शक्य झाले आहे.*
जे लोक या आजारापासून आतापर्यंत पूर्णपणे सुरक्षित ते लोक सुद्धा पूर्वखबरदारी म्हणून आपल्या खात्रीपूर्वक सुरक्षेसाठी फ़क्त *अश्वगंधा, तुलसी व गिलोय ( गुळवेल )* हे दिवसातून 3 वेळा जेवणानंतर घेऊ शकतात. ज्या लोकांना विशेषतः गावाकडच्या शक्य आहे ते खबरदारी म्हणून तुळशी व गुळवेल चा काढा स्वतः बनवून पिऊ शकतात.
यासोबतच आपण सर्वजण दैनंदिन दिनक्रमात प्राणायाम, सूर्यनमस्कार, योग्य शारीरिक व्यायाम इ. गोष्टींचा समावेश करून स्वतः ला शारीरिक व मानसिकदृष्टया खात्रीशीरपणे तंदुरुस्त, मजबूत, सुरक्षित आणि आनंदी ठेवू शकतो.
*आतापर्यंत ज्या रुग्णांनी वैद्यकीय उपचारासोबतच सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान व योग्य शारीरिक व्यायाम या गोष्टी केल्या, ते इतरांपेक्षा अधिक वेगाने आणि खात्रीशीरपणे बरे होतात हे अगोदरच सिध्द झालेले आहे.*
*अधिक माहितीसाठी आणि वरील औषधे मिळवण्यासाठी आपण जवळच्या पतंजली स्टोअर्स किंवा कोणत्याही आयुर्वेद औषधालायमध्ये संपर्क करू शकता..*
*माझी सर्व देशवासियांना कळकळीची नम्रविनंती आहे की, आपण सर्वांनी या औषधीचा फायदा करून घ्या.. आणि ही माहिती लवकरात लवकर आपले कुटुंब, नातेवाईक, मित्र परिवार व बाकी सर्वांपर्यंत पोचवा..*
संपूर्ण देश जेवढ्या लवकरात लवकर कोरोनामुक्त होईल, तेवढ्याच लवकर सगळ्या गोष्टी पूर्ववत सुरळीत होतील.
*हा संदेश सर्वांपर्यंत पोचवा Forward to All*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नीची डेप्युटी कलेक्टर म्हणून नियुक्ती
तेलंगणा : पूर्व लडाखच्या गलवान घाटीमध्ये झालेल्या हिंसक झडपेत शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नीची डेप्युटी कलेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आलंय. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी त्यांना सुर्यपेट जिल्ह्याचे डेप्युटी कलेक्टर पद देऊन सन्मानित केलंय. १५ जून रोजी चीनी सैनिकांसोबत झालेल्या झडपेत कर्नल संतोष बाबू यांच्यासहीत २० जण शहीद झाले होते.
कर्नल बाबू हे १६ बिहार रेजीमेंटचे कमांडींग ऑफीसर (सीओ) होते. तेलंगणाच्या सुर्यपेट येथे ते राहत होते. कर्नल बाबू यांच्या पत्नीला सरकारी नोकरी, घरच्या उदरनिर्वाहासाठी ५ कोटी रुपये आणि जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव स्वत: त्यांच्या घरी जाऊन नियुक्ती पत्र, ५ कोटींचा चेक सोपवणार आहेत.
Monday, 22 June 2020
#CoronaUpdate-OSMANABAD 22/06/2020
#CoronaUpdate
दि. 22/6/2020.रोजी सा रु #उस्मानाबाद येथून 42 swab तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले आहेत, त्यापैकी चार पॉसिटीव्ह, दोन inconclusive व 36 नेगेटिव्ह असा आहे.
पॉसिटीव्ह पेशंट
1पेशंट सलगरा (दि)ता. तुळजापूर- पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील. दुसरा पेशंट इडा ता. भूम. तिसरा पेशंट नाळीवडगाव ता. भूम येथील असून तो मुंबई रिटर्न आहे व चौथा पेशंट फनेपुर ता. लोहारा येथील असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहे.
Total cases 183.
Discharge 136.
Death 07.
Active patient .40.
टीप -आज दोन पेशंट पूर्वीच पॉसिटीव्ह असून ते सोलापूर येथे उपचार घेत असून, ते तुळजापूर तालुक्यातील आहेत, व ते सोलापूर येथे पॉसिटीव्ह आलेले असून ते आपल्या कडे वर्ग झाले आहेत.
Subscribe to:
Comments (Atom)












