Monday, 10 August 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 10TH,2020


---------------------------------------------

कळंब तालुक्यात आज दिवसभरात तब्बल 42 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.कळंब तालुक्यातील शनिवारी घेण्यात आलेल्या

स्वाबचे अहवाल प्राप्त झाले आहेत. कळंब तालुक्यात तब्बल 27 जण बाधित आढळले असून त्यात कळंब शहरातील16 तर इटकूर येथे

7 तर बोर्डा गावात 2, डिकसळ आणि डोळा पिंपळगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण बाधित आढळला आहे, अशी माहिती उपजिल्हा

रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे यांनी दिली आहे. तर आज दिवसभरातून तालुक्यातून 179 जणांचे रॅपिड अँटीजन्स

टेस्ट करण्यात आले होते. त्यापैकी 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामध्ये कळंब शहरात 2, ढोराळा 4, खामसवाडी 5,

दहिफळ,भाटशिरपुरा आणि युसूफ वडगाव प्रत्येकी 1 तर ताडगाव येथे 2 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आज दिवसभरात एकूण

42 जण बाधित आढळले आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी दिली आहे. त्यात कळंब शहरात 18

पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.



Sunday, 9 August 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 9TH 2020

 🛑 *ब्रेकिंग अपडेट*
कळंब शहर 16+ग्रामीण 10+
एकूण 26+अँटीजेन-16 
*एकूण कळंब तालुका 42 पॉझिटिव्ह*
*अधिक माहितीसाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या चॅनेलला Subscribe करा.*
https://youtu.be/xDS3sYDZ9VQ

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 9TH,2020 AT 2:00 PM

 उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस

 वाढत चालली आहे. रविवार दि. ९ ऑगस्ट रोजी 206  जणांचा कोरोना रिपोर्ट

 पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या 

आता 2468 वर पोहचली आहे. 





Saturday, 8 August 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 8TH, 2020 AT 9:30 PM


---------------------------------------------

कळंब तालुक्यात कोरोनाने थैमान घातला आहे. संध्याकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार

तब्बल 33 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आज दिवसभरात तब्बल 64 रुग्णांची भर

पडली आहे. काल म्हणजेच (शुक्रवारी) बाधित रुग्णांच्या संपर्कात अलेल्यांचा 65 जणांचा

स्वाब घेण्यात आला होता. त्यापैकी 33 जण बाधित आल्याची माहिती डॉ. वायदंडे यांनी दिली.

या बाधित रुग्णांमध्ये प्रभारी नगराध्यक्षा यांचा देखील समावेश आहे.

या 33 जणांमध्ये कळंब शहरात 13 रुग्ण सापडले आहेत. तर बोरगाव येथे 7, कोथळा 4,

खेरडा, भाटशिरपुरा, कण्हेरवाडी, रत्नापुर या गावांमध्ये प्रत्येकी 1 जण बाधित आढळला आहे.

तर डिकसळ येथे एकाच कुटुंबातील 5 जण बाधित आढळले आहेत.



OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 8TH, 2020 AT 7:00 PM


कळंब तालुक्यात रॅपिड अँटीजन्स टेस्टमध्ये 16 जणांचा

 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर आज दिवसभरात कळंब

 तालुक्यात 31कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. 

एकाच दिवसात 31 रुग्ण सापडल्याने कळंब तालुक्यात 

खळबळ उडाली आहे. कळंब तालुक्यात आज एकूण 87 

जणांचे रॅपिड अँटीजन्स टेस्ट करण्यात आल्या, त्यापैकी 

दहिफळ गावात 7,खामसवाडीमध्ये 5, मस्सा येथे 2 आणि

 पानगाव व चोराखळी येथे प्रत्येकी एक पॉझिटिव्ह रुग्ण 

पॉझिटिव्ह आढळला आहे, अशी माहिती उपविभागीय 

अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी दिली.

कळंब तालुक्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपकेंद्र 

प्रयोगशाळेत आणि औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत 

पाठवण्यात आलेल्या स्वाब नमुन्यांचे अहवाल आज दुपारी 

प्राप्त झाले होते, त्यात 15 जण पॉझिटिव्ह सापडले होते. 

संपर्कातील लोकांचे लवकर अहवाल हातीयावे म्हणून

प्रशासनाने रॅपिड अँटीजन्स टेस्ट मोहीम हाती घेतली आहे.

यात 15 ते 20 मिनिटात अहवाल कळतो. त्यामुळे दररोज 

जास्तीत जास्त टेस्ट केल्या जात आहे. काल देखील 140 

पेक्षा जास्त जणांचे रॅपिड टेस्ट करण्यात आले त्यात 22 जण

 बाधित आढळले होते. आता उद्या शहरातील 100 व्यापारी, 

अधिकारी, पत्रकार, बँक कर्मचारी, दुर्धर आजारी 

असलेल्यांची रॅपिड अँटीजन्स टेस्ट करण्याच्या सूचना

उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी दिल्या आहेत.



OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 8TH 2020 AT 2:00 PM

कोरोना:-उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवार दि.08/08/2020 










रोजी एकूण 120 कोरोनाग्रस्त रूग्ण सापडले. 









Friday, 7 August 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 7TH,2020 AT 1:00 PM

 उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवार

 दि. ७ ऑगस्ट रोजी १३० जणांचा कोरोना

 रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे तर गेल्या 

२४ तासात दोघांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या 

दोन हजार पेक्षा जास्त झाली असून, बळींची संख्या ६३ झाली आहे.




Thursday, 6 August 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES

 कळंब : तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला आहे. आज दिवसभरात तब्बल 

56 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. एकाच दिवसात 56 रुग्ण अढळल्याने खळबळ

 उडाली आहे. परवा म्हणजे मंगळवारी पाठवण्यात आलेल्या नामुन्यांपैकी 26 रुग्णांचा 

अहवाल आज दुपारी प्राप्त झाला होता. कळंब शहर 7 येरमाळा 9, मस्सा 8, डिकसळ 2 

असे 26 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर आज गुरुवारी नगरपालिका कर्मचाऱ्यांचे

 रॅपिड अँटीजन्स टेस्ट करण्यात आली त्यात नगराध्यक्षा त्यांचे पती आणि रजेवर असलेले

 उपनगराध्यक्ष यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते, अशी माहिती डॉ. जीवन वायदंडे यांनी दिली.

त्यानंतर आज 10 वाजता कालचे म्हणजेच बुधवारी पाठवण्यात आलेल्या नमुन्यांचे अहवाल

 प्राप्त झाले आहे. त्यात आणखी 27 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत आहेत. या 27 जणांमध्ये

 रत्नापुर 17, मस्सा 6, कण्हेरवाडी, इटकूर, दहीफळ, येरमाळा प्रत्येकी एक अशे पॉझिटिव्ह

 आलेल्याची माहिती आहे. त्यापैकी इटकूर व्यतिरिक्त सर्वच जण पूर्वीच्या बधितांच्या

 संपर्कातील असल्याची माहिती, डॉ. शिंदे यांनी दिली. तर इटकूर येथील रुग्णाला लक्षणं

 जाणवत असल्याने टेस्ट करण्यात आली त्यात ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. परवाचे 

प्राप्त झालेले 26, कालचे 27 तर आजचे 3 अँटीजन्स अशी एकूण दिवसभरात 56 अहवाल

 पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत 

https://youtu.be/wRYV0MEDk7s 

Watch vdo

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 6TH, 2020 AT 8:00 PM

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गुरुवार 
दि. ६ ऑगस्ट रोजी ११४ जणांचा कोरोना
 रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील
 कोरोना रुग्णाची संख्या १९०० पर्यंत गेली आहे. 
कोरोनाने आतापर्यंत ६१ जणांचा बळी गेला आहे. 




OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 6TH, 2020



कळंब तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून एकही बाधित रुग्ण आढळला नव्हता. मात्र आज (गुरूवारी) रॅपिड अटीजन्स टेस्टमध्ये कळंब नगरीच्या नगराध्यक्षा, रजेवर असलेले उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष यांच्या पतीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर मंगळवारी कळंब तालुक्यातून पाठवण्यात आलेल्या स्वाब पैकी 26 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

 या 26 मध्ये कळंब शहरातील 7, येरमाळा 9, मस्सा 8 

आणि डिकसळ 2 अशे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे 

सर्व पूर्वीच्या बधितांच्या संपर्कातील आहेत, अशी माहिती 

उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.शिंदे यांनी दिली.

कळंब नगरीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी स्वतः 

व्हाट्सअप्पद्वारे ही माहिती दिली. तशेच आमच्या 10 

दिवसात कोणी संपर्कात आल्यास त्यांनी टेस्ट करून

 घ्यावी, असं त्यांनी म्हटलंय. 

नगराध्यक्षांची मुलाखत



Wednesday, 5 August 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 5TH, 2020 AT 8:00 PM

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या २४ तासात
 ( बुधवारी ) कोरोनामुळे दोघांचा बळी गेला आहे.
 त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या
 रुग्णाची संख्या आता ६१ गेली आहे. 

 जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून काल दि. 04/08/2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील प्रयोशाळेत
 138 व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा 
विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथील प्रयोशाळेत 
177 असे एकूण 315 स्वाब नमुने तपासणी साठी पाठवण्यात आलेले आहेत, त्याचा स्वाब अहवाल
 रात्री उशिरापर्यंत प्राप्त होईल.




🔷 आज दिवसभरात पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात
 81 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.

🔷रॅपिड अँटीजेन टेस्टचा पॉझिटिव्ह अहवाल उद्या 
सविस्तर देण्यात येईल.

🔹 मृत्यू बाबतची  माहिती:-

1) 77 वर्षीय पुरुष, अणदुर ता. तुळजापूर.

2) 65 वर्षीय पुरुष, फातिमानगर लोहारा. 
(औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू)


🔹 जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 1709 
(* 18 रॅपिड अँटीजेन  टेस्ट)
🔹 जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 620
🔹 जिल्ह्यातील एकूण उपचारा खालील रुग्ण - 1023
🔹 जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 61
🔹 घरी विलगीकरण करण्यात आलेले रुग्ण - 05


◼️वरील माहिती. दि  05/08/2020 रोजी सायंकाळी 08:00 वाजेपर्यंतची आहे.

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 5TH 2020 AT 1:30 PM

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बुधवारी  ७८ जणांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णाची संख्या १६९१ गेली आहे. तसेच ५९ जणांचा बळी गेला आहे. 




Tuesday, 4 August 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 4TH 2020 AT 7:00 PM

🛑 *"उस्मानाबाद जिल्हा कोरोना अपडेट"*🛑


दि. 04/08/2020 

सायंकाळी 07:00 वाजता


🔹 जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून काल दि. 03/08/2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील प्रयोशाळेत 175 व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथील प्रयोशाळेत 64 असे एकूण 239 स्वाब नमुने तपासणी साठी पाठवण्यात आलेले आहेत, त्याचा स्वाब अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त होईल.


🔷 आज दिवसभरात पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात 17 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.


🔹 जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 1613 (* 7 पॉझिटिव्ह रुग्णांचे स्वाब डबल प्राप्त झाले होते)

🔹 जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 539

🔹 जिल्ह्यातील एकूण उपचारा खालील रुग्ण - 1015

🔹 जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 59


◼️वरील माहिती. दि  04/08/2020 रोजी सायंकाळी 07:00 वाजेपर्यंतची आहे.