Friday, 3 July 2020

जिभेचा व्यायाम ( Toung Twister )

जिभेचा व्यायाम ( Toung Twister ) फक्त या नव्या पिढीलाच नाही तर खुद्द समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा त्यांच्या काळात लिहून ठेवले आहे. बघा पटापट न चुकता म्हणता येते आहे का ते....😀😄


*लाटानुप्रास*


ज्याला मराठी भाषेचा अभिमान आहे त्यांच्यासाठी हा *भाषालंकार* अनुप्रास समुद्राच्या लाटांप्रमाणे येतो..


श्रीसमर्थरामदास कृत नृसिंहपंचक


नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें

प्रगट रुप विशाळें दाविलें लोकपाळें

खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें

तट तट तट स्तंभि व्यापिलें वन्हीजाळें।।


झळझळीत झळाळीं ज्वाळलोळें झळाळी

लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी।


लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी

हळहळीत हळाळीं गोळमाळा हळाळी

कळकळीत कळाळीं व्योम पोळीत जाळीं।।


कडकडित कडाडीं कडकडाटें कडाडीं

घडघडित घडाडीं घडघडाटें घडाडीं

तडतडित तडाडीं तडतडाटें तडाडीं

धडधडित धडाडीं धडधडाटें धडाडीं।।


भरभरित भरारी भर्भराटे भरारी

थरथरित थरारी थर्रथराटे थरारी

तरतरित तरारी तर्तराटे तरारी

चर्चरित चरारी चर्चराटे चरारी।।


रजनिचर विभांडी दो करें पोट फोडी।

गडगडित गडाडी आंतडी सर्व काढी।

न धरित जन मानें लोक गेलें निदानें।

हरिजन भजनानें शांत केलें दयेनें।।


न अडखळता मोठ्ठ्याने म्हणण्याचा प्रयत्न करून पहा...

Thursday, 2 July 2020

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २ जुलै रोजी ११ पॉजिटीव्ह


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील  अकरा  जणांचा कोरोना रिपोर्ट  आज  पॉजिटीव्ह आला आहे. त्यात उमरगा तालुक्यातील सात, तुळजापूर तालुक्यातील दोन, परंडा तालुक्यातील एक  आणि भूम तालुक्यातील एक असा  समावेश आहे.आज २ जुलै रोजी उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातून १४१  स्वाब लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी अकरा पॉजिटीव्ह, सात अनिर्णित  आणि  १२३  निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाले आहेत.पॉजिटीव्ह रुग्ण खालील प्रमाणे आहेत. एक रुग्ण नालगाव ता. परांडा ( पूर्वीच्या पॉसिटीव्ह रुग्णाच्या  संपर्कातील )एक रुग्ण लक्ष्मीनगर भूम ( पूर्वीच्या पॉसिटीव्ह रुग्णाच्या च्या संपर्कातील )सात रुग्ण हे उमरगा तालुक्यातील आहेत. त्यापैकी एक कसगी, एक रुग्ण गुगळगाव व पाच रुग्ण  हे उमरगा शहरातील आहेत. सात पैकी  सहा  जण उमरग्यातील प्रायव्हेट रुग्णालयातील कर्मचारी आहेत..एक रुग्ण  खडकी तांडा ता. तुळजापूर येथील असून पूर्वीच्या पॉजिटीव्ह रुग्णाच्या च्या संपर्कातील आहे व एक रुग्ण  प्रॉपर तुळजापूर येथील आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातकोरोना बाधित रुग्ण - २४६

 बरे झालेले रुग्ण - १७८ 

मृत्यू - १२ 

ऍक्टिव्ह रुग्ण - ५६ 


युरिक अ‍ॅसिड म्हणजे काय?काय काळजी घ्यावी...


सांधेदुखी बरी होत नसेल तर ‘युरिक अ‍ॅसिड’ वाढले असे सहजपणे म्हटले जाते. युरिक अ‍ॅसिड वाढण्याचा त्रास आणि त्यायोगे होणारा संधिवात हा अस्वस्थ करणारा आहे. ‘युरिक अ‍ॅसिड’ म्हणजे नेमके काय, ते कशाने वाढते, काय खावे, जेणेकरून ते सतत नियंत्रणात राहील. हे जाणून घेवूया. योग्य प्रकारे पथ्य व आहार घेतल्यास हा त्रास टाळता येतो.

हा त्रास होण्याचे मुख्य कारण म्हणजे. किडनी अकार्यक्षम असणे. किडनी मध्ये फिल्टर हे कार्य होत असते. याआधी पचनसंस्थेत बिघाड होत असतो आणि मग किडनी अकार्यक्षम होत असते. म्हणून आजार होण्याआधी पचनसंस्था ठिकठाक असली की पुढील आजार होत नाही. आहारात व्हिटामिन सी खूप महत्वाचे आहे. पण युरिक एसिड झाल्यास व्हिटामिन सी पथ्य बनते. आणि मग पचनसंस्था आणि किडनी हे दोन प्रॉब्लेम होतात. येथेही काळजी घेतली नाही तर मग मुत्र पिंड बाधित होते. आणि मग एक एक आजार वाढत जातो. म्हणून यूरिक एसिड होण्याआधीच काळजी घ्या पचनसंस्था बळकट करा... तरी खालील गोष्टीचे अनुकरण करून हळूहळू  हा त्रास कमी करून पचनसंस्था सुधारेल... पचनसंस्था सुधारली की आजार आपोआपच लांब राहील.


*हे खाणे टाका....*

* युरिक अ‍ॅसिड असताना मका व तत्सम पदार्थ पूर्णत: टाळायला हवेत. उडीद डाळ, चण्याची डाळ, राजमा, वाळवलेले कडवे वाल, गोडे वाल, वाटाणे यांचे सेवन युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढवते. कुळिथाचा वापर वात व्याधीत फायदेशीर असला तरी युरिक अ‍ॅसिडद्वारे होणाऱ्या संधिवातामध्ये तो टाळायला हवा. 


* पालक, चुका अंबाडी, मेथीची भाजी, करडई या पालेभाज्या त्रास वाढवताना दिसून येतात. साबुदाणा, भगर, दही हे पदार्थ टाळलेले उत्तम. 


* उसाचा रस, चिंचेचा वापर या व्यक्तींनी टाळायला हवा.  बाजारात सध्या उपलब्ध असणारे हवाबंद डब्यातील किंवा पाकिटातील पदार्थही टाळावेत. हे पदार्थ टिकवण्यासाठी वापरलेल्या रासायनिक घटकांमुळे युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. 


* थंड पदार्थ, विशेष करून आइस्क्रीमसारख्या वात वाढवणाऱ्या पदार्थाचे सेवन करू नये. पाणीपुरीमधील पुरीसुद्धा या आजारामध्ये त्रास वाढवते. नासवलेले पदार्थ, खाऊ  नयेत. डाळींचा आहारामध्ये प्रमाणापेक्षा जास्त वापर करू नये. उडिदाच्या पापडामुळे युरिक अ‍ॅसिड वाढते.


*काय खावे?*

* युरिक अ‍ॅसिडच्या त्रासामध्ये न खाण्याचीच यादी मोठी असते, हा विचार करून पथ्य अनेकांकडून पाळले जात नाही. आणि व्याधी वाढवून घेतात, परंतु खाण्याचे खूप उत्तम चविष्ट प्रकार युरिक अ‍ॅसिड कमी करताना दिसून येतात. 


* हळदीचा उपयोग अधिक फायदेशीर आहे. विविध भाज्यांमध्ये हळदीचे प्रमाण वाढवावे, तसेच हळद आणि आल्याचे लोणचे नियमित खावे. रोज सकाळी हळद पाणी पिण्याने हा त्रास कमी होण्यास मदत होते.


* मूग, मसूर, तूर पाण्यात हळद टाकून त्याचे सूप सेवन केल्यास उत्तम. मूग, मसूर, तूर, मटकी यांचे घट्ट वरण निषिद्ध असले तरी त्याचे शिजवलेले पातळ पाणी ऊर्जा देणारे असून या आजाराचा त्रास कमी करते. 


* बऱ्याच रानभाज्या खाण्यानेही फायदा होतो. तांदुळका, चाकवत, लाल माठ, शेवगा पाने, करडी, सरसू उपयुक्त ठरतात.


गुळवेल ही वनस्पती अनेकांना परिचित असेल. त्याच्या पानांची भाजी युरिक अ‍ॅसिडच्या त्रासाबरोबरच इतर अनेक  त्रासही कमी करते. यासोबतच रक्त शुद्ध होते, वजनही कमी होते आणि प्रतिकारक्षमता वाढते. कारली, पडवळ या भाज्यादेखील फायदेशीर आहेत. मात्र यामध्ये डाळी घालू नयेत. 


* धने व जिरे घालून पाणी उकळावे आणि नंतर ते गाळून दिवसभरात सेवन केल्यास त्रास कमी होतो.


*हेही टाळावे...*

* मांसाहारी व्यक्तींना त्रास झाल्यास झिंगे, खेकडे, बोकडाचे मटन, भेजा, सुके मासे, हलवा हे पदार्थ टाळावेत. 


* उकडलेली अंडीसुद्धा खाणे शक्यतो टाळावे. हे पदार्थ शिजवताना त्यामध्ये तीळ, दगडफूल, मिरे, सुंठ यांचा अधिक वापर केल्यास ते बाधण्याची शक्यता कमी असते. तळलेले मासे मात्र खाऊ  नयेत. मांसाहाराच्या पदार्थामध्ये खोबऱ्याचा वापर करावा. 


*   बंद डब्यातील पदार्थामध्ये मिठाचा वापर अधिक होत असल्याने त्यांचे सेवन टाळलेले उत्तम. मैद्याचे तळलेले पदार्थ रुग्णांनी सेवन केल्यास तात्काळ त्रास होण्याची शक्यता असते.


* युरिक अ‍ॅसिडचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी दिवसा झोपू नये. वात विकारांमध्ये युरिक अ‍ॅसिडचा त्रास समाविष्ट असला तरी गरम पाण्याचे सेवन या व्यक्तींनी टाळावे. सुंठ, वावडिंग, पिंपळी घालून उकळलेल्या पाण्याचे सेवन केल्यास फायदेशीर असते. युरिक अ‍ॅसिड ही एक अवस्था असून पथ्यांचे पालन करून आरोग्यदायी पदार्थाचे सेवन केल्यास या अवस्थेतून बाहेर पडणे सहज शक्य आहे.

शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला-८०)

दि..२ जुलै २०२०  वार - गुरूवार




नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!


     शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.


*महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने*  *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत  या कालावधीत आपल्या अभ्यासासाठी आम्ही विविध मार्ग अवलंबणार आहोत.*


*यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक मार्ग ...*


शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष पाठ्यांश सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी उजळणी व विविध कृती व उपक्रम आपण देत आहोत. 

हे उपक्रम सर्व विद्यार्थी कृती करून पाहू शकतात आणि त्याचा आनंद घेऊ शकतात. 


या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!

    

ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.


https://bit.ly/dikshadownload


दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.

https://bit.ly/3g2ONdy


*कोरोना योद्धा*

https://bookyboo.com/virus-warrior-marathi


*मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका*

खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.

08033094243


*ओरिगामी*

सोप्या पद्धतीने बनवा शार्क मासा

https://bit.ly/2BTOLG8


*अवांतर वाचन* 

आजच्या पुस्तकाचे नाव : आमची गोष्ट

https://bit.ly/3gcnbCL


*चित्रकला/हस्तकला*

मासोळी - पाण्याची राणी

https://bit.ly/2YLQwhy


*आरोग्य आणि सुरक्षा*

किटकांमार्फत रोगप्रसार

https://bit.ly/3eNsVm4


*संगणक विज्ञान*

आर्टिस्टिक मिडीया

https://bit.ly/38fEAHO

 

*संगीत/नाटक*

Musical Glass

https://bit.ly/2CUY8pn


*मजेत शिकूया विज्ञान*

Balloon on fire

https://bit.ly/3ihufjp


*इयत्ता १०वी अभ्यासमाला*

विषय - गणित भाग १

पाठ - गणित भाग 1

घटक - अर्थनियोजन

https://bit.ly/2NMy81Q


*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*

*इयत्ता - ५ वी*

विषय - मराठी

घटक - एकाच अर्थाचे भिन्न शब्द

https://bit.ly/3ico5AW


*इयत्ता - ८ वी*

विषय - गणित

घटक - परिमेय संख्या व त्यावरील क्रिया

https://bit.ly/3gdIzY9


*Stay home, stay safe!*


आपला

*दिनकर पाटील,*

*संचालक*

*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*

Wednesday, 1 July 2020

उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा पॉजिटीव्ह

कोरोना : १ जुलै रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा पॉजिटीव्ह 


उस्मानाबाद -  उस्मानाबाद  जिल्ह्यातील सहा जणांचा कोरोना रिपोर्ट बुधवारी  पॉजिटीव्ह आला आहे. त्यात   उस्मानाबाद शहरातील  दोन,  तुळजापूर तालुक्यातील दोन, उमरगा तालुक्यातील एक आणि परंडा शहरातील एक असा समावेश आहे. आज  आज 1 जुलै ( बुधवार )  रोजी रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 107 नमुने  तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून सहा   पॉजिटीव्ह , 6 अनिर्णित 1 रिजेक्ट व  94 निगेटिव्ह असा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. पॉजिटीव्ह रुग्ण  उस्मानाबाद शहरातील एमआयडीसी भागातील दोन, तुळजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथील दोन,परंडा शहरातील एक आणि उमरगा तालुक्यातील डिग्गी रोड येथील एक असा समावेश आहे. 

कोरोना अपडेट 

 एकूण  बाधित रुग्ण - 235  

बरे झालेले रुग्ण -  175

मृत्यू - 12  

ऍक्टिव्ह रुग्ण - 48  


केस गऴती Hair fall


1) केस गळणे ही सौंदर्य बिघडविणारी सर्वात मोठी समस्या आहे. केस गळणे थांबवून ते पुन्हा परत आणण्याचेही काही उपाय आहेत. केसांचे आरोग्य हे बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असते त्यामुळे फक्त तेल लावून केस गळणे थांबवणे अवघड आहे. पण जर तुम्ही Hair Loss थांबवण्यासाठी केसांची निगा संपूर्ण घेतली म्हणजे तुमचे केस पुन्हा वाढायला लागतील यासाठी आणखी काय करता येईल ते पुढे पाहू. 


2) मक्याचे तेल घेऊन त्यामध्ये आवळ्याचा रस किंवा जास्वंदीची पाने उपलब्ध असल्यास त्यांचा रस मिक्स करून केसांना मालीश करावी. 


3) आवळा, कोथंबीर आणि लिंबू यांचे मिश्रण केसांना लावा. थोडयावेळाने केस धुवून घ्या. केस मजबूत होतील आणि तुटणार नाहीत. 


4) बदाम खालल्याने केसांना आवश्यक असणारे विटामिन्स मिळतात. 


5)  केसांना डाय करणे, कलर लावणे, प्रेस करणे किंवा कोणत्याही प्रकारे केसांना नुकसान पोहचेल अश्या गोष्टी करणे टाळा. 


6) पौष्टिक आणि योग्य आहार, व्यायाम, केसांना तेल लावणे, पाणी भरपूर प्यावे. 


7) वाईट व्यसनाच्या पासून दूर रहावे. 


8) Hair Loss Problem होण्यासाठी अनेक कारणे असतात त्यामध्येच एक Vitamin D ची कमतरता हे देखील एक कारण असू शकते. जसे इतर पोषक घटक केसांचे आरोग्य वाढवतात तसेच Vitamin D हे देखील केसांचे आरोग्य वाढवते. Vitamin D हे एक निशुल्क असा घटक आहे. Vitamin D केसांच्या वाढीसाठी मदत करतो. Vitamin D स्वताहून Iron and Calcium शोषून घेतो. Iron ची कमतरता पण Hair Loss होण्याचे कारण असते. तुम्ही दिवसातील १५ मिनिट सूर्यप्रकाशात राहिलात तरी तुमची त्यादिवाशाची Vitamin D ची आवश्यकता पूर्ण होते. सूर्यकिरण घेत असताना सकाळचे किंवा संध्याकाळचे सूर्यकिरण अंगावर घ्या प्रखर सूर्यकिरण त्वचेला अपाय करू शकतो हे पण लक्षात ठेवा. 


9) बरेचसे लोक असंतुलित खानपानाच्या सवयी मुळे Hair Loss Problem मध्ये फसतात. केवळ पौष्टिक आहार घेऊन Hair Loss Problem पासून दूर राहता येत नाही तर त्यासोबतच जंकफुड, डबाबंद पदार्थ, तळलेले पदार्थ अश्या पदार्था मध्ये पौष्टिक तत्व कमी असतात म्हणून असे पदार्थ कमी खावेत. त्याएवजी फळ, सुका मेवा, भाज्या, दुध अंडी असे पौष्टीक आहार घ्यावा 


10)  हेलमेट घालण्या अगोदर डोके कपड्याने किंवा रुमालाने बाधून मग हेलमेट घालावे. 


11) जर मोठया प्रवास करण्यासाठी जात असाल तर काही वेळाने रस्त्यात थांबून हेलमेट काढून केसांना हवा मिळू दया. कारण केसांना हवेची गरज असते. 


12) केस जमल्यास दररोज किंवा एक दिवसा आड धुणे. केस नेहमी स्वच्छ ठेवण्याची सवय लावणे. 


13) योग्य आहार घेणे.

गिरवलीच्या कोरोनाग्रस्त तरुणाचा मृत्यू


भूम - भूम तालुक्यातील गिरवली येथील एका २८ वर्षीय कोरोनाग्रस्त तरुणाचा अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला आहे. भूम तालुक्यातील कोरोनामुळे झालेला हा पहिलाच मृत्यू आहे. जिल्ह्यात कोरोनाचा हा बारावा बळी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. आतापर्यंत २२८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून पैकी १७३ बरे झाले आहेत, मात्र बारा जण दगावले आहेत. गिरवली (ता. भूम) येथील २८ वर्षीय तरुणाची प्रकृती खराब वाटल्यामुळे हा तरुण ईट (ता. भूम) येथील संजीवनी हॉस्पिटल या खासगी  रुग्णालयामध्ये तीन दिवस येथे उपचार घेतले. त्या ठिकाणी काहीच फरक पडला नसल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याच्या भावाकडे अंबाजोगाई येथे उपचारासाठी गेला. आंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात त्याने उपचार घेतले. त्या ठिकाणी स्वॅब घेतल्यानंतर शुक्रवारी (ता. २६) त्याला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्याचा  कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर कोरोनाशी झुंज देताना त्याचा मंगळवारी (ता. ३०) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तरुणाचा ईट परिसरातील अनेकांशी संपर्क  असल्यामुळे मृत्यूच्या बातमी काळतच ईट परीसरामध्ये लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना अपडेट 
कोरोना बाधित रुग्ण 228
बरे झालेलं रुग्ण 173 
मृत्यू - 12 
ऍक्टिव्ह रुग्ण 43

Tuesday, 30 June 2020

कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात आज आठ पॉजिटीव्ह





उस्मानाबाद  - उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ  जणांचा कोरोना रिपोर्ट आज पॉजिटीव्ह आलेला आहे. त्यात  उमरगा तालुक्यातील पाच, परंडा तालुक्यातील  २ आणि उस्मानाबाद तालुक्यातील एक असा समावेश आहे. आज ३०  जून रोजी  सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 112  स्वाब तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून आठ  पॉजिटीव्ह 94  निगेटिव्ह, 10 INconclusive रिपोर्ट आले आहेत. पॉजिटीव्ह रुग्णामध्ये उमरगा शहरातील चार आणि  उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील एक, उस्मानाबाद तालुक्यातील नागोबा वाडी येथील एक , परंडा तालुक्यातील नालगाव एक आणि आसू येथील एक असा समावेश आहे. 

कोरोना बाधित रुग्ण - 228 

बरे झालेलं रुग्ण - 173 

मृत्यू - 11 

ऍक्टिव्ह रुग्ण 44


औषधीय गुणों से युक्त : जामुन

🌹औषधीय गुणों से युक्त : जामुन🌹

औषधीय गुणों से युक्त जामुन का फल शीतल, रुक्ष तथा कफ-पित्तशामक होता है | इसमें लौह तत्त्व,औषधीय गुणों से युक्त जामुन का फल शीतल, रुक्ष तथा कफ-पित्तशामक होता है |इसमें लौह तत्त्व, फॉलिक एसिड, विटामिन ‘बी’ व ‘सी’  पर्याप्त मात्रा में पाये जाते हैं | 

जामुन ह्रदय के लिए एवं रक्ताल्पता, पेशाब की जलन, अपच, दस्त, पेचिश, संग्रहणी, पथरी, रक्तपित्त, रक्तदोष आदि में लाभदायी है | मधुमेह (diabetes) के लिए यह वरदानस्वरुप माना जाता है |

जामुन की छाल, गुठलियों और पत्तों का भी औषधीय रूप में उपयोग किया उपयोग किया जाता है | इसके कोमल पत्तों का २० मि.ली. रस निकालकर उसमें थोड़ी मिश्री मिला के पीने से खूनी बवासीर में खून गिरना बंद होता है | प्रयोग के दौरान लाल मिर्च व खटाई का सेवन न करें |

🌹जामुन का गुणकारी औषधीय पेय

अच्छे पके जामुनों के १ लीटर रस में १ कि.ग्रा. मिश्री मिलाकर उबालें | एक तार की चाशनी बन जाय तो छान के बोतल में भर लें | १० से २५ मि.ली. पेय को दस्त, संग्रहणी, उलटी, जी मिचलाना, गले की सूजन आदि तकलीफों में पानी के साथ तथा अत्यधिक मासिक स्त्राव, प्रमेह, सूजाक, खूनी बवासीर आदि में मक्खन के साथ लेने से उत्तम लाभ होता है |

🌹गुठलियों के भी बेहतरीन लाभ🌹

जामुन की गुठलियों के चूर्ण में ऐसे-ऐसे औषधीय गुण हैं जो उसके फल में भी नहीं हैं | जामुन की गुठलियों को सूखा के उनका चूर्ण बना लें अथवा यह तैयार चूर्ण आयुर्वेदिक औषधियों की दूकान पर भी मिलता है | यह विभिन्न रोगों में लाभदायी है :

१] स्वप्नदोष : २-३ ग्राम चूर्ण सुबह-शाम पानी के साथ लेने से स्वप्नदोष ठीक होता हैं |

२] श्वेतप्रदर:  २ ग्राम चूर्ण चावल की धोवन या चावल के पानी के साथ दिन में २ बार लेने से श्वेतप्रदर में लाभ होता है |

३] मधुमेह व बार-बार लगनेवाली प्यास : २-३ ग्राम चूर्ण पानी के साथ दिन में २-३ बार लेने से इन रोगों में लाभ होता है |

४] नींद में बिस्तर गीला करना (nocturnal enuresis): रात्रि को सोते समय १ ग्राम चूर्ण पानी के साथ देने से लाभ होता है |

५] दस्त:  ५-७ ग्राम चूर्ण को छाछ के साथ दिन में २ बार लेने से लाभ होता है |


🔹सावधानियाँ : १] अधिक मात्रा में जामुन न खायें अन्यथा शरीर में जकड़ाहट तथा बुखार हो सकता है |

२] भोजन के पूर्व या खाली पेट जामुन खाने से वात की वृद्धि तथा अफरा होता है | अत:भोजन के पश्चात अन्न का पाचन हो जाने पर (भोजन के तुरंत बाद फल नहीं खाने चाहिए) नमक (यथासम्भव सेंधा नमक ) और काली मिर्च के चूर्ण के साथ इन्हें थोड़ी मात्रा में खाना चाहिए | इससे इनका वातवर्धक दोष कम हो जाता है |

अंजीर फळाचे फायदे




उन्हाळा व पावसाळा या दोन्ही ऋतुत अंजीराचा सीझन असतो. 



उन्हाळ्यात येणारे अंजीर गोड असतात. अंजीर या फळातून शरीराला 



लोह, व्हिटॅमिन्स ए. बी. सी बऱ्याच प्रमाणात मिळते. तसेच शर्करा ही 



भरपूर प्रमाणात मिळते. अंजीर हे फळ खायला थंड व पचायला जड 



असतात. यां फळाच्या सेवनाने गॅससेची तक्रार दूर होते. तसेच या 



फळातील औषधीगुणांमुळे पित्त विकार, रक्तविकार, व वात ही दूर होतात. 



अपचन ऍसिडीटी, गॅसेसचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी दररोज सकाळ-



संध्याकाळ १ ते २ अंजीर खावीत किंवा याचा रस प्यावा यामुळे तुम्हाला



 या त्रासापासून आराम मिळेल. अंजीर खाल्यानी बौद्धिक व शारिरीक 



थकवा दूर होण्यास मदत होते. लघवीचा त्रास होत असल्यास दिवसातून



 तीन-चार अंजीर नियमितपणे खावीत यामुळे मुत्रविकार दूर होतात. 



अशक्त व्यक्तींनी अंजिराचे रस अथवा खाल्याने गुणकारी परिणाम होतात.



 त्वचा विकार, त्वचेची आग होणे व कांजण्या या आजारात आराम 



पडण्यासाठी अंजीर खावीत. दररोज कोणतेही एक फळ खाल्याने शरीर



 निरोगी नक्कीच बनते. अंजीर हे फळ खाल्ल्याने अजीर्णाचा त्रास कमी



 होतो. त्याचप्रमाणे पोटात केस गेल्यावर अंजीर खाल्यामुळे त्याचे पाणी



 होते, असे म्हणतात. अंजीर शक्तीवर्धक आहे. तसेच ते सारकही आहे.



 म्हणजे ओली किंवा सुकी दोन अंजिरे झोपण्याच्या वेळी खाऊन थोडे



 पाणि प्यावे. थोड्याच दिवसात तक्रार दूर होते.




उस्मानाबादेत कोरोनामुळे आणखी एक रुग्ण दगावला

उस्मानाबादेत कोरोनामुळे आणखी एक रुग्ण दगावला 


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल असलेला एक कोरोनाग्रस्त वृद्धाचा  मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे १० जण दगावले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत २१७ जणांना कोरोनाने घेरले आहे. पैकी १६८ बरे झाले असले तरी आतापर्यंत ११ जणांना कोरोनाने कवेत घेतले आहे. तुळजापूर शहरातील एक ७२ वर्षीय रुग्ण उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात मरण पावला. त्यास मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता, त्यात कोरोना झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.

कोरोना बाधित रुग्ण - २१७ 
बरे झालेलं रुग्ण - १६८ 
मृत्यू - १०
ऍक्टिव्ह रुग्ण ३९

Monday, 29 June 2020

उस्मानाबाद - सात पॉसिटीव्ह, एक अनिर्णित व एक rejected व 50 negative

दि. 29/6/2020.रोजी सामान्य रुग्णालय #उस्मानाबाद येथून 59 नमुने  तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून सात  पॉसिटीव्ह, एक  अनिर्णित व एक rejected व 50 negative असा आहे.


पॉसिटीव्ह पेशंट-

2 तुळजापूर तालुका, 2 पेशंट बालाजी नगर उमरगा, 3 पेशंट MIDC उस्मानाबाद. सर्व पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहेत.

Total cases 217.

Discharge    168.

Death               10.

Active patients 39.

Sunday, 28 June 2020

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात तीन पॉजिटीव्ह

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन पॉजिटीव्ह 


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन  जणांचा कोरोना रिपोर्ट आज पॉजिटीव्ह आलेला आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या २०९ आणि ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ३४  झाली आहे.आज २८ जून रोजी  सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून ५८  स्वाब तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून तीन  पॉजिटीव्ह  व ५५ निगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत.पॉजिटीव्ह तीन रुग्णापैकी दोन रुग्ण ईडा ता. भूम आणि एक रुग्ण नालगाव ता. परंडा येथील आहेत. सर्व रुग्ण पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातकोरोना बाधित रुग्ण - २०९

बरे झालेलं रुग्ण - १६६

मृत्यू - ९

ऍक्टिव्ह रुग्ण  ३४