Wednesday, 5 August 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 5TH 2020 AT 1:30 PM

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बुधवारी  ७८ जणांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णाची संख्या १६९१ गेली आहे. तसेच ५९ जणांचा बळी गेला आहे. 




Tuesday, 4 August 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 4TH 2020 AT 7:00 PM

🛑 *"उस्मानाबाद जिल्हा कोरोना अपडेट"*🛑


दि. 04/08/2020 

सायंकाळी 07:00 वाजता


🔹 जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून काल दि. 03/08/2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील प्रयोशाळेत 175 व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथील प्रयोशाळेत 64 असे एकूण 239 स्वाब नमुने तपासणी साठी पाठवण्यात आलेले आहेत, त्याचा स्वाब अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त होईल.


🔷 आज दिवसभरात पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात 17 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.


🔹 जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 1613 (* 7 पॉझिटिव्ह रुग्णांचे स्वाब डबल प्राप्त झाले होते)

🔹 जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 539

🔹 जिल्ह्यातील एकूण उपचारा खालील रुग्ण - 1015

🔹 जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 59


◼️वरील माहिती. दि  04/08/2020 रोजी सायंकाळी 07:00 वाजेपर्यंतची आहे.



OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 4TH 2020 AT 12:00 PM

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी ४५ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णाची संख्या १६२० झाली आहे. पैकी ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. 

Monday, 3 August 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 3RD 2020 AT 7:00 PM

🛑  *"उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना अपडेट"*




दि. 03/08/2020

सायंकाळी 07:00 वाजता


🔹 जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून काल दि. 02/08/2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील 

प्रयोशाळेत 138 व डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद 

येथील प्रयोशाळेत 39 असे एकूण 177

 स्वाब नमुने तपासणी साठी पाठवण्यात 

आलेले आहेत, त्याचा स्वाब अहवाल रात्री

 उशिरापर्यंत प्राप्त होईल. तसेच आज दुपारी 

उस्मानाबाद येथून 38 स्वाबचा अहवाल 

प्राप्त झाला असून त्याचा अहवाल खालील

 प्रमाणे आहे.

✅ *प्राप्त दुरुस्तीनुसार*

(अंशतः बदल कृपया नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रेस नोट मध्ये स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तुर ता. लोहारा असे नसून "स्पर्श हॉस्पिटल उस्मानाबाद" असे वाचावे.)

🔹लोहारा - 05

1) 25 वर्षीय पुरुष, स्पर्श रुग्णालय 

उस्मानाबाद .

2) 25 पुरुष, स्पर्श  रुग्णालय उस्मानाबाद.

3) 25 वर्षीय पुरुष, स्पर्श  रुग्णालय उस्मानाबाद.

4) 25 वर्षीय पुरुष, स्पर्श  रुग्णालय उस्मानाबाद


5) 28 वर्षीय पुरुष, स्पर्श  रुग्णालय उस्मानाबाद

 


🔹कळंब - 03

1) 7 वर्षीय मुलगा, मंगरूळ ता. कळंब.

2) 41 वर्षीय पुरुष, मस्सा, ता. कळंब.

3) 43 वर्षीय पुरुष, संभाजी नगर, डिकसळ

 ता. कळंब.


▪️पाठवण्यात आलेले स्वाब - 57

▪️प्राप्त अहवाल - 38

▪️पॉझिटिव्ह - 09

▪️ निगेटिव्ह -29

▪️ इनकनक्लुझिव्ह - 0

▪️ प्रलंबित - 19


 🔹मृत्यू बाबतची माहिती:-

1) 70 वर्षीय पुरुष, सावरकर चौक, उस्मानाबाद.


🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 1575  

(काल  व आज एकूण 4 पॉझिटिव्ह रुग्णांचे

 swab डबल प्राप्त झाले होते)

🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले 

रुग्ण - 522

🔹जिल्ह्यातील उपचाराखालील रुग्ण - 995

🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 58


◼️वरील माहिती. दि  03/08/2020 रोजी सायंकाळी 07:00 वाजेपर्यंतची आहे.



Sunday, 2 August 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 2ND 2020 AT 9:45 PM

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी 

रात्री आणखी १०६ कोरोना रुग्णाचा रिपोर्ट 

पॉजिटीव्ह आलेला आहे. त्यामुळे दिवसभरात 

२८० रुग्णाची भर पडली आहे. तसेच जिल्ह्यात 

आतापर्यंत सापडलेल्या कोरोना रुग्णाची 

संख्या १५७० झाली आहे तर ५७ जणांना बळी गेला आहे.

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 2ND 2020

कळंब तालुक्यात 7 वाढले, शहरातील आणखी 


एका बड्या कुटुंबात कोरोनाचा प्रवेश






कळंब : कळंब तालुक्यातील कोरोना बाधित 

रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. 

तालुक्यात आणखी कोरोना बाधित 7 रुग्णांची 

भर पडली आहे. शनिवारी तालुक्यातील एकूण 

15 संशयितांचे रॅपिड अँटीजन्स टेस्ट घेण्यात आले, 

त्यांपैकी 3 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, 

अशी माहिती कळंब उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय

 अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे यांनी दिली.

 त्यात माळकरंजा येथील 2 तर रत्नापुर येथील

 बाधित व्यक्तीच्या संपर्कातील 1 जण पॉझिटिव्ह

 आला आहे.
शुक्रवारी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात 

आलेले स्वाबपैकी 3 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

 त्यात सात्रा, रत्नापुर आणि कळंब शहर असे

प्रत्येकी एक अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. 

कळंब शहरात बाधित आलेली व्यक्ती शहरातील

 मोहा रोड येथील आहे. शहरात आणखी एका

 बड्या व्यापारी आणि 30 ते 40 सदस्य असलेल्या

 कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. 

सुरुवातीला या कुटुंबातील एका महिलेचा अहवाल 

बार्शी येथे पॉझिटिव्ह आला आहे, असं डॉक्टर

 वायदंडे म्हणाले. आता कुटुंबातील व्यक्तींना

 महावीर भवन कळंब येथे क्वाराईनटाईन केले आहे.


या कुटुंबाचे ही कळंब शहरात 2 मोठे जनरल स्टोअर्स एक 

ऑटोमोबाईल्सचे दुकान आहे. म्हणून या कुटुंबातील

 व्यक्तींच्याही संपर्कात किती जण आलेत, याचा शोध 

प्रशासन घेत आहे. मात्र एकही बाधित रुग्ण नसलेल्या 

कळंब शहरात बड्या व्यापाऱ्याच्या कुटुंबातील वृद्ध 

व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला बाहेर जिल्ह्यातील लोक 

आल्यामुळे शहरात कोरोनाचा संसर्ग मोठयाप्रमानात 

वाढला आहे. त्यामुळे सर्वानुमते उद्यापासून म्हणजे

 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट शहरा जनता कर्फ्यु पाळला 

जाणार आहे. मात्र या कालावधीत बधितांच्या संपर्कातील

 लोकांनी समोर येऊन तपासणी करणे गरजेचे आहे.

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 2ND 2020 AT 1:00PM


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. रविवार दि. २ ऑगस्ट रोजी तब्बल १७४ जणांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या आता १४६४ झाली आहे..

🔹 दि. 01/08/2020 रोजी शासकीय 
वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद व 
 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा 
विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे 513 
 स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी
 478 रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद 
यांना प्राप्त झाले असून त्याचा संक्षिप्त अहवाल
 खालीलप्रमाणे आहे.

➤ पाठवलेले स्वाब नमुने – 513
➤ प्राप्त रिपोर्ट्स – 478
➤ पॉझिटिव्ह – 174
➤ निगेटिव्ह – 260
➤ इनक्लुझिव्ह – 44
➤प्रलंबित -35

*️⃣ तालुका निहाय संक्षिप्त माहिती 
खालीलप्रमाणे आहे.

🔹 उमरगा:- 63
🔹 तुळजापूर:- 44
🔹 कळंब:- 03
🔹 वाशी:- 01
🔹 परंडा:- 06
🔹 उस्मानाबाद :- 55
🔹 लोहारा :- 03
♦️ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:- 174

🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण – 1464
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी 
गेलेले रुग्ण – 516
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील
 रुग्ण – 891
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 57 




Saturday, 1 August 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 1ST 2020 AT 8:30 PM

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात 

कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले आहेत.

 जिल्ह्यात गेल्या २४ तासात (शनिवारी )

 तीन जणांचा बळी गेला आहे. त्याचबरोबर 

औरंगाबाद येथून आलेल्या रिपोर्ट मधून 

आणखी 4 कोरोना रुग्णाची वाढ झाली आहे. 





🔹 जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून 

काल दि. 31/07/2020 रोजी डॉ. बाबासाहेब

 आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद 

येथील प्रयोशाळेत 402 व डॉ. बाबासाहेब 

आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र 

उस्मानाबाद येथील प्रयोशाळेत 111 असे 

एकूण 513 स्वाब नमुने तपासणी साठी 

पाठवण्यात आलेले आहेत, त्याचा स्वाब 

अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त होईल. 

तसेच आज दुपारी औरंगाबाद येथून 44 

स्वाबचा अहवाल प्राप्त झाला असून त्याचा

 अहवाल खालील प्रमाणे आहे.

पाठवण्यात आलेले स्वाब - 548
➤ प्राप्त अहवाल - 44
➤पॉझिटिव्ह - 04
➤ निगेटिव्ह -17
➤ इनकनक्लुझिव्ह - 23
➤ प्रलंबित - 504

 🔹मृत्यू बाबतची माहिती:-

1) 45 वर्षीय पुरुष, फिल्टर टाकीजवळ, 

उस्मानाबाद.(बार्शी येथे उपचारादरम्यान मृत्यू)
2) 50 वर्षीय पुरुष, किनारा हॉटेल जवळ, 

उस्मानाबाद.
3) 75 वर्षीय पुरुष, लहुजी नगर, उस्मानाबाद.

🔹चार पॉजिटीव्ह रुग्ण : उमरगा 

1) 50 वर्षीय पुरुष, कोळीवाडा उमरगा.
2) 37 स्त्री, महादेव गल्ली, उमरगा.
3) 16 वर्षीय स्त्री, महादेव गल्ल्ली, उमरगा.
4) 14 वर्षीय पुरुष, महादेव गल्ली, उमरगा.

🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 1290
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले 

रुग्ण - 516
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण 

- 717
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 57

◼️वरील माहिती. दि  01/08/2020 रोजी

 सायंकाळी 08:30 वाजेपर्यंतची आहे.

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 1ST 2020 AT 1:00 PM

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या

 झपाट्याने वाढत आहे. शनिवार दि. १ ऑगस्ट रोजी १२३ जणांचा

 कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. दरम्यान  निष्क्रिय जिल्हा शल्य 

चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांना राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे 

आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव यांनी सक्तीच्या रजेवर पाठवले असून आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्नाची संख्या

 दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच[प्रमाणे मृत्यू दर वाढला आहे. जिल्हा शासकीय 

रुग्णालयात दोन रुग्णाचा मृत्यू हा निष्क्रियतेचे बळी ठरले होते.

 आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डॉ. गलांडे यांचे उस्मानाबाद दौऱ्यात

 कान टोचले होते, परंतु त्यांच्या  कार्यपद्धतीमध्ये बदल झाला नाही.

 आरोग्य यंत्रणेशी त्यांचा समन्व्य नव्हता. त्यामुळे कोरोना रुग्णाचा 

मृत्यू दर वाढला होता. अखेर गलांडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात 

आले आहे. डॉ. डी.के. पाटील यांच्याकडे प्रभारी चार्ज देण्यात आला आहे.

आजचे रिपोर्ट. ...




OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 1ST 2020






कळंब : कळंब तालुक्यात आणखी 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

 त्यामुळे तालुक्यातील बधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी प्राप्त 

झालेल्या अहवालाप्रमाणे कळंब शहरात 3 जण पॉझिटिव्ह आले आहेत, त्यात 2 रुग्ण हे त्या

 बड्या व्यापाऱ्याच्या संपर्कातील आहेत तर 1 रुग्ण उपजिल्हा रुग्णालय कळंब येथील

 कर्मचारी आहे. तर डिकसळ गावात देखील आणखी 2 रुग्ण वाढले आहेत जे पूर्वीच्या 

संपर्कातील आहेत, ज्यात 70 वर्षीय वृद्धांचा समावेश आहे, अशी माहिती वैद्यकीय

 अधिकारी डॉ. वायदंडे यांनी दिली.

तर सात्रा या गावात देखील 6 रुग्ण आढळले आहेत जे पूर्वीच्या बधिताच्या संपर्कातील 

आहेत. या 6 रुग्णांमध्ये 6 महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. कोठाळवाडी गावातील

 पारधी वस्तीतील एकाच स्वाब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदरील व्यक्ती 

वाशी येथील ग्रामीण रुग्णालयात शिपाई म्हणून कार्यरत आहे.

कळंब शहरात एका बड्या व्यापाऱ्याच्या कुटुंबातील वृद्ध व्यक्तीचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीला इतर जिल्ह्यातील लोकही आले होते, तेथून त्या कुटुंबातील 48 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली होती. नंतर शहरात पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या वाढली. शहरातील चैन ब्रेक करण्यासाठी 3 ते 9 ऑगस्टपर्यंत जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे सोमवार पासून 7 दिवस कळंब शहरात जनता कर्फ्यु पाळण्यात येणार आहे.

Friday, 31 July 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 31ST 2020 AT 7:00 PM

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी १७४ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला होता. आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनामुळे पाच जणांचा बळी गेला आहे.

 🔹मृत्यू बाबतची माहिती:-

1) 45 वर्षीय पुरुष, हनुमान चौक, उस्मानाबाद.
2) 91 वर्षीय पुरुष, आनंद नगर, उस्मानाबाद.
3) 78 वर्षीय पुरुष, राजीव गांधी
 नगर, उस्मानाबाद.
4) 65 वर्षीय स्त्री, रा. ढोकी, ता. जि. उस्मानाबाद.
5) 70 वर्ष पुरुष, रा. रत्नापूर ता.
 कळंब. (बार्शी येथे उपचारादरम्यान मृत्यू)

🔹 जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून काल दि. 30/07/2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील प्रयोशाळेत 411 व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथील प्रयोशाळेत 39 असे एकूण 450 स्वाब नमुने तपासणी साठी पाठवण्यात आलेले आहेत, त्याचा स्वाब अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त होईल.

🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 1160  *(3 पॉझिटिव्ह रुग्णांचे स्वाब डबल प्राप्त झाले होते)
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 516
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 590
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 54

◼️वरील माहिती. दि  31/07/2020 रोजी सायंकाळी 07:00 वाजेपर्यंतची आहे.

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 31ST 2020 AT 1:30 PM

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूने हाहाकार उडवला आहे. शुक्रवार दि. ३१ जुलै रोजी तब्बल १७४ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आलेला आहे. रुग्णाची संख्या 1163 वर पोहचली आहे. त्याचबरोबर ४९ जणांचा आजवर बळी गेला आहे.







Thursday, 30 July 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 31ST 2020

धक्कादायक बातमी एक दोन नव्हे तर तब्बल 21 नवे रुग्ण सापडले!


https://youtu.be/CnhfmJBt4j4


🛑कळंब शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर


https://youtu.be/CnhfmJBt4j4


कळंब-14,मंगरूळ-06,देवधानोरा-01


एकूण 21 रूग्ण सापडले.