Saturday, 15 August 2020
Friday, 14 August 2020
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 14TH,2020 AT 7:00 PM
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवार
दि. १४ ऑगस्ट रोजी १८२ कोरोना रुग्णाची भर
पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या
आता ३२२९ गेली आहे. पैकी १६२८ बरे झाले
असून, शुक्रवारी १०३ लोक बरे होऊन घरी गेले
आहेत. कोरोनाने आतापर्यंत ९४ लोकांचा बळी घेतला आहे.
Thursday, 13 August 2020
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 13TH,2020 AT 7:00 PM
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा
कहर सुरूच आहे. गेल्या २४ तासात सात जणांचा
मृत्यू झाला आहे तर गेल्या काही दिवसात इतर
जिल्ह्यात झालेले आणखी १३ मृत्यूची नोंद उस्मानाबाद जिल्ह्यात झाली आहे. आज एकूण २० जणांचा मृत्यूचा आकडा दाखवण्यात आला आहे. तसेच गुरुवारी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार १५५ जणांना कोरोनाची
बाधा झाली आहे.
Wednesday, 12 August 2020
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 12TH,2020 AT 8:00 PM
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे.
बुधवारी
रात्री आलेल्या रिपोर्टनुसार आणखी १२४ जणांची भर पडली आहे
तसेच गेल्या २४
तासात पाच जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
Tuesday, 11 August 2020
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 11TH,2020
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवार दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजता आलेल्या रिपोर्टनुसार आणखी ३५ रुग्णात वाढ झाली आहे.
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून काल दि. 09/08/2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत 148 स्वाब नमुने तपासणी साठी पाठवण्यात आलेले होते. त्याचा स्वाब अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाल आहे. त्याची माहिती खालील प्रमाणे➤एकूण पाठविण्यात आलेले स्वॉब – 148
➤ प्राप्त अहवाल – 148
➤ पॉझीटीव्ह अहवाल - 35
➤ निगेटीव्ह अहवाल – 107
➤ इनकनक्ल्यूझीव्ह – 06
पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या
➦ उस्मानाबाद – 07
➦तुळजापूर – 02
➦ उमरगा – 08
➦ कळंब – 14
➦ भूम – 04
◼️वरील माहिती. दि 11/08/2020 रोजी सकाळी 11:30 वाजेपर्यंतची आहे.
Monday, 10 August 2020
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 10TH,2020
---------------------------------------------
कळंब तालुक्यात आज दिवसभरात तब्बल 42 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.कळंब तालुक्यातील शनिवारी घेण्यात आलेल्या
स्वाबचे अहवाल प्राप्त झाले आहेत. कळंब तालुक्यात तब्बल 27 जण बाधित आढळले असून त्यात कळंब शहरातील16 तर इटकूर येथे
7 तर बोर्डा गावात 2, डिकसळ आणि डोळा पिंपळगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण बाधित आढळला आहे, अशी माहिती उपजिल्हा
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे यांनी दिली आहे. तर आज दिवसभरातून तालुक्यातून 179 जणांचे रॅपिड अँटीजन्स
टेस्ट करण्यात आले होते. त्यापैकी 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामध्ये कळंब शहरात 2, ढोराळा 4, खामसवाडी 5,
दहिफळ,भाटशिरपुरा आणि युसूफ वडगाव प्रत्येकी 1 तर ताडगाव येथे 2 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आज दिवसभरात एकूण
42 जण बाधित आढळले आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी दिली आहे. त्यात कळंब शहरात 18
पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.
Sunday, 9 August 2020
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 9TH 2020
🛑 *ब्रेकिंग अपडेट*
कळंब शहर 16+ग्रामीण 10+
एकूण 26+अँटीजेन-16
*एकूण कळंब तालुका 42 पॉझिटिव्ह*
*अधिक माहितीसाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या चॅनेलला Subscribe करा.*
https://youtu.be/xDS3sYDZ9VQ
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 9TH,2020 AT 2:00 PM
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस
वाढत चालली आहे. रविवार दि. ९ ऑगस्ट रोजी 206 जणांचा कोरोना रिपोर्ट
पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या
आता 2468 वर पोहचली आहे.
Saturday, 8 August 2020
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 8TH, 2020 AT 9:30 PM
---------------------------------------------
कळंब तालुक्यात कोरोनाने थैमान घातला आहे. संध्याकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार
तब्बल 33 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आज दिवसभरात तब्बल 64 रुग्णांची भर
पडली आहे. काल म्हणजेच (शुक्रवारी) बाधित रुग्णांच्या संपर्कात अलेल्यांचा 65 जणांचा
स्वाब घेण्यात आला होता. त्यापैकी 33 जण बाधित आल्याची माहिती डॉ. वायदंडे यांनी दिली.
या बाधित रुग्णांमध्ये प्रभारी नगराध्यक्षा यांचा देखील समावेश आहे.
या 33 जणांमध्ये कळंब शहरात 13 रुग्ण सापडले आहेत. तर बोरगाव येथे 7, कोथळा 4,
खेरडा, भाटशिरपुरा, कण्हेरवाडी, रत्नापुर या गावांमध्ये प्रत्येकी 1 जण बाधित आढळला आहे.
तर डिकसळ येथे एकाच कुटुंबातील 5 जण बाधित आढळले आहेत.
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 8TH, 2020 AT 7:00 PM
कळंब तालुक्यात रॅपिड अँटीजन्स टेस्टमध्ये 16 जणांचा
अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर आज दिवसभरात कळंब
तालुक्यात 31कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे.
एकाच दिवसात 31 रुग्ण सापडल्याने कळंब तालुक्यात
खळबळ उडाली आहे. कळंब तालुक्यात आज एकूण 87
जणांचे रॅपिड अँटीजन्स टेस्ट करण्यात आल्या, त्यापैकी
दहिफळ गावात 7,खामसवाडीमध्ये 5, मस्सा येथे 2 आणि
पानगाव व चोराखळी येथे प्रत्येकी एक पॉझिटिव्ह रुग्ण
पॉझिटिव्ह आढळला आहे, अशी माहिती उपविभागीय
अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी दिली.
कळंब तालुक्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपकेंद्र
प्रयोगशाळेत आणि औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत
पाठवण्यात आलेल्या स्वाब नमुन्यांचे अहवाल आज दुपारी
प्राप्त झाले होते, त्यात 15 जण पॉझिटिव्ह सापडले होते.
संपर्कातील लोकांचे लवकर अहवाल हातीयावे म्हणून
प्रशासनाने रॅपिड अँटीजन्स टेस्ट मोहीम हाती घेतली आहे.
यात 15 ते 20 मिनिटात अहवाल कळतो. त्यामुळे दररोज
जास्तीत जास्त टेस्ट केल्या जात आहे. काल देखील 140
पेक्षा जास्त जणांचे रॅपिड टेस्ट करण्यात आले त्यात 22 जण
बाधित आढळले होते. आता उद्या शहरातील 100 व्यापारी,
अधिकारी, पत्रकार, बँक कर्मचारी, दुर्धर आजारी
असलेल्यांची रॅपिड अँटीजन्स टेस्ट करण्याच्या सूचना
उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी दिल्या आहेत.
Subscribe to:
Comments (Atom)































